मधुमेही
आम्हांला साखर तारते, आणि मारते पण.
मा.मुख्याध्यापक एस.जी.घोबले(घोबाळे)
सेलमोहकर.
मा.मुख्याध्यापक एस.जी.घोबले(घोबाळे)
सेलमोहकर.
अलीकडील काळात मधुमेहाचे प्रमाण फार वाढले आहे जो तो आज मधुमेह ग्रस्त झाला आहे यात मोठ्या पासून ते छोट्या पर्यंत साऱ्यांनाच मधुमेहाने जखडले सर्व जगात ही समस्या सारखीच आहे. मधुमेह होण्याचे फार प्रमाणात वाढले आहे. सध्या Lockdownआहे हाताला काम नाही दुकाने बंद आहेत मग घरात राहूनच online Articles News च्या Platform वर कामे करतो. मी आज मधुमेह होण्याचे कारण मिमांसा करण्याचे ठरवले. दररोजच्या प्रमाणे छोट्या बहिणीने पप्पांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले मी त्यांच्या जवळच बसून होतो हे सारं पहात होतो राहून राहून आज पक्कं ठरवलं की, आज पप्पांना विचारायचं हा मधुमेह कशामुळे होतो? कारण आता हे उन्हाळ्याचे दिवस म्हणजे चोहीकडे टरबूज खरबूज आंब्याचं मुबलक प्रमाणात फळे येतात पण आमच्यासाठी पप्पा दारावर आलेले फळे घेतात पण स्वतः मात्र खात नाहीत? का तर साखर वाढेल. मला आठवते माझ्या लहानपणी बाजारातून पप्पांनी केळी इतर फळे आणले की मम्मी ते स्वच्छ धुवून नंतर ते माठाच्या खाली व्यवस्थित झाकून ठेवायची वरती त्या फळांवर ओले कापड ठेवून द्यायची कारण त्या वेळी गोरगरीब किंवा मध्यम वर्गीय यांना माठा शिवाय दुसरा पर्याय नव्हता. आधी तुरळक एखाद्या कडेच फ्रिज असेल.पप्पा शाळेतून घरी आले की आम्ही संध्याकाळी सर्व एकत्र बसून पप्पा मम्मी व आम्ही भावंडे ते फळे खात पण आता मम्मी गेल्यापासून हे दृश्य फार विरळ झाले आहे पप्पांना मधुमेहाने घेरले आहे ते आमच्यासाठी फळे घेतात पण स्वतः मात्र फळे खात नाहीत? कसा हा आजार.
मी त्यादिवशी पप्पांना विचारले पप्पा मधुमेह कशामुळे होतो त्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तरे देण्यास सुरुवात केली तसतशी माझी पेन चालू लागली राजूभाऊ मधुमेह होण्याचे कारण भरपूर आहेत.
१) अति ताणतणाव.
२) मेहनतीची कामे न करणे.
३). झोप कमी घेणे.
४) अवेळी जेवण करणे.
५) अति प्रमाणात गोड खाणे
६). आरामात जीवन जगणे.
७). श्रमाचे काम न करणे.
८) हातापायांची हालचाल न करणे.
९). उत्साहाचा अभाव असणे. असे कितीतरी कारणे देता येतील.
तसे पाहिले तर साखर ही आपल्या शरीरासाठी चांगली पण आहे कारण साखरेमुळे शरीरामध्ये ऊर्जा तयार होते यामुळे आपले सर्व शरीर निरोगी ताजेतवाने राहते. राजूभाऊ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण श्रमाचे काम केल्यानंतर किंवा उन्हामध्ये बाहेर फिरल्यास शरीर थकते कारण जेवढे पाणी पिले तेवढे घामावाटे त्वचेतून बाहेर पडते मग गरमीचे प्रमाण जसे जसे वाढण्यास सुरुवात होते तसे काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते मग त्यासाठी लिंबू सरबत, आईस्क्रीम, रुआफसा इत्यादी शरीरासाठी घेतोत. शरीरामध्ये साखर पेशिंसाठी उपयुक्त असते एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची मात्रा नाश्त्याच्या अगोदर 90 ते 130 व जेवणानंतर दोन तासांनी 170 पेक्षा कमी असते पण मधुमेह झालेल्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नसल्यामुळे किंवा त्यांना काही लक्षणं जाणवल्यास त्यांनी त्वरित मधुमेह तज्ञ कडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार जेवणाच्या आधी उपाशीपोटी रक्ताची लघवी ची टेस्ट करावी व जेवल्यानंतर दोन तासानंतर पुन्हा ल्याबला जाऊन रक्ताची लघवीची टेस्ट करावी व तो रिपोर्ट आपणास साधारणत दोन ते तीन तासानंतर आपणास मिळाल्यानंतर आपल्या मधुमेह तज्ञ डॉक्टरांना दाखवून शरीरामध्ये किती इन्शुलिनची मात्रा घ्यावी त्याची रीतसर माहिती घ्यावी लागते व त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा.
मी पप्पांना दुसरा प्रश्न लगेच विचारला की, रात्री बेरात्री तुम्हाला साखर कमी झाल्याचे टेस्ट न करता कशावरून कळते. ? राजूभाऊ साखर कमी झाल्यास मला दरदरून घाम येतो जीव कासावीस बेचैन होतो त्या वेळी मी तुला किंवा संध्यास साखर मला लवकर खाण्यास मागवितो साखरेचे तिन चमचे खालेकी हे सारं बंद होते त्यामुळे साखरेची पुडी माझ्याकडे ठेवुनी देतो आणि पुन्हा मी निरोगी होतो. म्हणुन म्हणतो साखर आम्हाला मारते आणि तारते पण.
माझ्या शरीरामध्ये साखरेची वाढ व कमी साखरेची कमी होवु नये यासाठी महिन्याला मला या टेस्ट करावे लागतात ते फार मधुमेहींसाठी फार गरजेचे आहे. आमच्या रक्तामध्ये इन्शुलिनचा वापर होणे असमर्थ असल्यास आन्ना पासून तयार झालेली सर्व साखर ग्लुकोज रक्तामध्ये साचून राहते व त्यामुळे शरीरास इंधन म्हणून वापरता येत नाही. शरीराला ऊर्जा तर मिळतच नाही शरीरामध्ये साखरेचे प्रमाण अति झाले तर रक्तामधील आपला मेंदू हृदय रक्तवाहिन्या यांनाही मारक ठरू शकते मधुमेह असलेल्यांसाठी यावर इन्शुलिन हेच एकमेव आहे. साधारणत आता एका निष्कर्षावरून जागतिक स्तरावर केलेल्या अध्याय नावावरून असे पाहिले की वयाच्या 40 वर्षावरील व्यक्तींमध्ये मधुमेहाचा आजार वाढताना दिसत आहे आणि त्याचबरोबर आता लहान मुलांना युवकांना यांनासुद्धा मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे इन्शुलिनचा वापर यामुळे इन्शुलिनचा वापर केला पाहिजे फार आधीपासून आपल्या देशात आयुर्वेदाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजूभाऊ मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना जास्त तहान लागते तसेच लघवी उन्हाळी लागल्यागत सारखी सारखी येते जेवण थोड्या थोड्या वेळा करावे वाटते म्हणजे भुक सारखी लागते वजन कमी झाल्यासारखे वाटते पायामध्ये सारख्या वेदना होतात पायात मुंग्या आल्या गत होते. अशी लक्षणे जाणवत असल्यास त्वरित मधुमेह तज्ञ कडे जाऊन वेळीच उपचार करून घ्यावा मधुमेह झालेल्या व्यक्तीने आपल्याला कोणत्याही प्रकारचा मार लागण्यापासून थोडे सावध सजग दक्ष राहणे कारण मधुमेह झालेल्या व्यक्तीला एखादी जखम हातात व पायास झाल्यास ती जखम वाढत जाऊन त्यास ग्याग्रीन होऊन त्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते. मी पप्पांना म्हणालो पप्पा तुम्ही सुरुवातीला स्वतःहून इन्शुलिन्स् घेत असत तेव्हा तुम्ही मांडीमध्ये घेत असत आता पोटामध्ये घेत आहात त्यावर पप्पा मला म्हणाले राजूभाऊ इन्शुलिन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या भागात मांसल जागी घेता येते. १) मांडी मध्ये 2) पोटावर बेंबीपासून थोडे दूर 3) खुब्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मांसल भाग असतो त्या ठिकाणी घेता येतो. सांगायचा मुद्दा हा की मधुमेह झालेल्यांनी इन्शुलिन इंजेक्शन कशे धरावे घेतांना. दुसरे म्हणजे मधुमेह झालेल्यांनी एकदाच पोटभर जेवन न करता थोड्या थोड्या अंतराने जेवन करणे फार गरजेचे आहे आपले गोळ्या औषधे वेळेवर घेणे फार गरजेचे आहे. तसेच मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्यास आयुवेर्दिक शुगर अवे शिरप सुद्धा घेवु शकता त्याने सुद्धा मधुमेह आटोक्यात येवु शकतो.
उपाशीपोटी साखरेचे प्रमाण १२६ व त्या पुढे १०० ते १२५
जेवणानंतर साखरेचे प्रमाण २०० व त्या पुढे १३९ ते १४०
सर्व साधारण साखरेचे प्रमाण
९९ उपाशीपोटी १३९ जेवणानंतर
अतिश्रमाचे कामे करणाऱ्यांना हा मधुमेह कमी प्रमाणात होतो पण जो बैठे कामे करतात किंवा बाहेरील सटरफटर खाने जे आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आज घडीला बैठे कामाचे प्रकार फार वाढले आहेत मुले तासनतास मोबाईलवर कम्प्युटरवर मोबाईल लॅपटॉप वर सारखे खिळवून बसतात आपले काहीतरी फास्ट फुट खाण्याची सवय झोप कमी ही यामुळे मधुमेह होऊ शकतो.
काहीजण अति प्रमाणात गोड खातात ते पण चुकीचे आहे, यामुळे आपण मधुमेहाला निमंत्रण देत आहोत असेच होईल.
मधुमेह होऊ नये यासाठी झोप प्रमाणात घ्यावी म्हणजे सहा तासांची झोप शरीराला आवश्यक आहे त्यानंतर येणारी झोप झोप नसून तो आळस आहे मधुमेह झालेल्यांनी किंवा न झालेल्यांनी हा मधुमेहाचे प्रमाण वाढू नये यासाठी योग प्राणायाम आपल्या शरीरा नुसार करावेत इन्शुलिन इंजेक्शन फ्रिज असेल तर फ्रिज अती थंड ठिकाणी ठेवू नये इन्शुलिन हे गरम ठिकाणी ठेवू नये फ्रिजच्या दाराच्या बाजूला इन्शुलिन ठेवावे.जर आपल्याकडे फ्रिज नसेल तर आपण माठा खाली ठेवणे योग्य होईल. अशी काळजी इंजेक्शन ठेवताना घ्यावी मधुमेह झालेल्यांनी त्यातल्यात्यात बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मग ती स्त्री असो किंवा पुरुष युवक मुले यांनी आहार व्यायाम औषधे यांचा वापर करून मधुमेहा टाळता येऊ शकतो.
मधुमेह खालील प्रमाणे टाळता येऊ शकतो नंबर एक वजन कमी करणे नंबर 2 नियमित व्यायाम करणे नंबर 3 पाणी वारंवार पिणे नंबर 4 श्रमाचे काम करणे झोप सहा तासांची घेणे. बैठे काम जास्त न करणे न श्रमाची कामे करणे यामुळे मधुमेह टाळण्यास मदत होते.
0 Comments:
Post a Comment