काकडी चे गुणकारी फायदे


https://www.swara33.com



आपल्या दररोजच्या आहारात ऋतुमानाप्रमाणे फळे व हिरवा भाजीपाला हा आसलाच पाहिजे, तसेच आहार हा एक सारखा नसावा. म्हणजे एके दिवशी भाजीपाला तर दुसर्‍या दिवशी डाळींचा व भाताचा समावेश आसावा यामुळे शरीराला विविध जीवनसत्वे, क्यालरीज मिळून आपले शरीर निरोगी राहते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात खनिज घटक आहेत त्याचबरोबर काकडी मध्ये कॅल्शियम पोट्यासियम ची मात्रा बर्‍याच प्रमाणात आसते,  तसेच क्षाराचे सुद्धा प्रमाण काकडी मध्ये जास्त आहे,  त्यामुळे काकडी ही थंड असल्या कारणाने शरीरातील विविध आजारावर ती गुणकारी आहे, आज आपण काकडीचे गुणकारी फायदे जाणून घेऊया.. 

काकडी गुणकारी :
काकडी चे गुणकारी फायदे खालील प्रमाणे 
  • गरम खाताना जिभेस चटका बसल्यास, किंवा भाजल्यास काकडी खावी आराम पडतो.
  • ज्यांना रात्री झोप येत नसल्यास त्यांनी काकडीचे काप करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याची दाह कमी तर होतेच परंतु झोप सुद्धा लागते व निद्रानाश ची समस्या ही दूर होते. 
  • पोटातील दाहवर सुद्धा काकडी खाल्याने आराम पडतो. 
  • तुरीचे वरण खाल्याने बर्‍याच जणांना पीत्त होते आसे पीत्त वारंवार होत आसेल तर काकडी खावी फरक बर्‍याच प्रमाणात जाणवतो.
  •  जागरणामुळे किंवा वेल्डिंग मुळे डोळ्याची आग होत आसेल तर आशा वेळी काकडी काप करून  डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची होणारी आग बर्‍याच प्रमाणात कमी होते. 
  • आम्लपित, ग्यासेस, करपट ढेकरे येत आसल्यास, किंवा अन्न पचन न झाल्यास काकडीचे काप करून त्यावर  लिंबाचा रस चार थेंब, काले मीठ  ते त्यावर टाकून खावे. अन्न पचन होऊन चयापचन ही सुधारते. 
  • काकडी ही शीतल गूणधर्माची आसल्या कारणाने आपल्या आजारात थंडीचे दिवस सोडून तिचे सेवन करावे, कारण ती थंड आसल्या मुळे सर्दी व खोकला होऊ शक्यतो. काकडी ही फ्रीज मध्ये ठेऊ नये, किंवा फ्रीज मधील लगेच खाऊ नये.   

0 Comments:

Post a Comment