नागीण (नागवेडा) या आजाराविषयी शहरी व ग्रामीण भागातील समज व गैर समज -
नागीण या आजाराविषयी प्रत्येकाला या आजाराविषयी जाणून घ्यायचे आहे गेल्या महिन्यातच माझ्या मावशीला नागिणीने विळखा मारला होता. मी आपल्या आईला म्हणायचे आई नगिन म्हणजे काय ग..? .आई म्हणायची अग.. सई ताईला नगिनेने विळखा मारला ताईच्या अंगावर बारीक बारीक पाणी भरलेले पुरल आली होती ताईला त्यामुळे पूर्ण शरीरभर आग झाली त्याचं आजाराला नागिन आणि ग्रामिणभागातिल यास नागवेडा म्हणतात. हो सई तुझ्या पप्पानासुद्धा ह्या नागिनीने डोक्यात व कपाळावर विळखा मारला होता. आज पण त्यांच्या कपाळावर दोन्ही भूवयाच्या मध्ये त्याची जखम आहे. अग सई काही जणी, जण बाबा बुवा कडे जाऊन दोरी गंडे सुद्धा करतात. हा आजार बरा होण्यासाठी काही करता येईल का ? घरगुती. आता उन्हाळा सुरू झाला आहे वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात.
हा त्रास छातीवर झाल्यास काही रुग्ण नागिणीच्या दुखण्यात प्रचंड आग होते आणि ठराविक अंतराने चमका मारतात. दोन-तीन दिवसांनंतर लालसर रंगाचे पुरळ येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोड सुरुवातीला लालसर असतात. नंतर त्यात पाणी भरते.
ज्या नसेवर हे फोड उमटतात, त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ लागते आणि हे फोडे येऊन शरीर खाजते व ज्या ठिकाणी आपले हात लागतील त्याठिकाणी आग होण्यास सुरवात होऊन त्या ठिकाणी बारीक लालसर पुरल पूर्ण शरीराची जागा व्यापतात त्यामुळे आपल्या ज्यांना नागिणीचा आजार झाला त्यांनी आपल्या स्वत:ची काळजी घेणे नितांत जरूरी आहे. नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळली की, या गोष्टीत काहीही तथ्य नाही कारण नागीण ही शक्यतो शरीराच्या एकाच बाजूला येते. नागीण बरी झाल्यावरसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या जवळ चमक मारणं, दुखणं असा त्रास होतो. नागिणीवर औषध नाही, असा गैरसमज असल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण इतर उपचार करू लागतो.
त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घ्यावेत. आजार झाला असताना जास्त दगदग टाळावी, हलका आहार घ्यावा. अंघोळीनंतर ती जागा प..घ्यावी स्वतःचे कपडे, साबण वेगळं ठेवावं.
सई मला तुझ्या आजीने म्हणजेच माझ्या आईने या नागिन आजारबद्दल जे संगितले ते गैरसमज दूर करण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
0 Comments:
Post a Comment