खोकल्याची उबळं दूर करी, डोंगरी शेंग बाभळंं.

https://www.swara33.com


 निसर्गाने आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी पृथ्वीतलावर दिलेले आहेत, फक्त त्याचा जाणकार असावा लागतो, आजारांवरील विलाजा करिता. तेच आपल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये. आज आपण खोकल्याच्या आजारा बद्दल जाणुन घेऊया, खोकला हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो..

  •  सर्दीचा खोकला उबळ
  •  दम्याचा खोकला उबळ
  •  कोरडा खोकला उबळ
  •  स्वयंपाकातील फोडणीचा खोकला
  •  टीबीचा खोकला उबळ
 डोंगरी भागामध्ये ही शेंग बाबळ आढळते ग्रामीण डोंगरी भागामध्ये खोकल्याची उबळ आली असता, किंवा खोकला आला असता वृद्धा पासून ते लहाण्यांची औषधी डोंगरी शेंग बाभळ हीचाच  आयुर्वेदिक औषधी म्हणून आजच्या घडीला सुद्धा वापर होतो, होताना दिसतो.

 ही डोंगरी बाभळ झुडपा सारखे पसरते जास्त उंच झाड नसते यास लागणार्या शेंगा वाळल्यानंतर या शेंगेचा  कलर कॉफी प्रमाणे असतो, हा एक बाभळीचा प्रकार आहे. ही शेंग सहजासहजी तुटत नाही वरून कॉफी कलर व आत‌ पांढरी लुसलुशीत साल एखाद्या कापसाप्रमाणे व त्यामध्ये बी याप्रमाणे.
या शेंगं ने खोकल्याची कोणत्याही प्रकारची उबळ थांबते असाच एक प्रकार माझ्यासोबत झालेला आहे.

 माझ्या मम्मीच्या आईने म्हणजेच गिरजा माय यांनी  मला हे औषध दिलेले आहे. त्याचे झाले असे की, आम्ही सर्व दिवाळीसाठी आजोळी उजनीला. बिड जिल्ह्यातील (कवड्याची उजनी) येथे गेलो होतो. माझे औषध-पाणी सोबतच होते माझे शरीर म्हणजे आजाराचे भांडारच इतर भावंडापेक्षा माझे आजारपण जरा जास्तच होते. माझी शरियष्ठची फार हाडकुळी सर्दी खोकला हे माझ्या पाचवीलाच पुजलेले यामुळे माझी काळजी जरा जास्त घेतल्या जात असे. कडाक्याची थंडी, असेच एकेदिवशी सर्व आपआपल्या  कामात होते, पप्पा मम्मी व मामा मंडळी माळवद घरामध्ये बसलेले होते.मी मामे भाऊ कुमार, धनू, तत्त्वशिल, सुरेश मस्के,बंडूभाऊ गायकवाड मावसभाऊ यांच्या सोबत वडाच्या झाडाखाली गोट्या खेळत असतांना अचानक मला खोकल्याची उबळ आली यामध्ये माझी तब्येत बिघडली. सुरेश भाऊने हे बाजुलाच बाजंवर झोपलेल्या रमेशभाऊ  यांना सांगितले, त्यांनी माझे औषधं आणण्यासाठी माळवद घरात आले. माझ्या बिघडलेल्या तब्येतीचे मम्मी पप्पा व मामांना सांगितले. मम्मीने ब्यागमध्ये जाऊन पाहिले असता माझे औषधं लुपिहीस्ट संपलेले होते.  माझा उबळेचा विलाज परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील बोरी येथे वडील जिल्हा परिषद हायस्कुला असल्या कारणाने आम्ही वास्तव्यास बोरी येथेच असतांना डॉ. वैद्य, डॉ. माळी सर  डॉ. राठोड, सर यांच्याकडेच होता.   मला उबळ आल्यास एक पोळणारे कंबरेत इंजेक्शन व लुपिहीस्ट हे ठरलेलेच माझे रामबाण औषधं. उजनी येथे त्यावेळी दवाखाने हे अपवाद ते पण धर्मापुरी किल्ल्याची, किनगाव,बिड, अंबाजोगाई,परळी, येथेच, कुणाला काय करावे काहीच समजेना.मला माळवद घरामध्ये झोपवले पण उबळ काही थांबता थांबेना.  मामा मामी मामे भाऊ, हिरकणी मावशी आम्ही सारे तिला आक्का म्हणतोत व मावसभाऊ निळूदादा, भाभी, गंगाभाऊ हे सारेच माझ्या आसपास जमले होते. कोणी कोमट पाणी तर कोणी बिब्याचे दुध देत होतं पण उबळं कांहीं थांबली नव्हती मम्मी व मावशी रडायलाच लागली होती. आता साधारणतः दुपारचे तिन वाजले होते  तेवढ्यात नेमकेच आजी आजोबा चाकुरहून तेथे पोहोचले हात पाय  धुवून माझ्याकडं आले. आजोबा ग्यानबा मस्के यांनी मला जवळ येवून पाहिले व आजी गिरजा माय यांना गाडग्यात ठेवलेली ही शेंग आणावयास सांगितल.  आजीने घरामध्ये  जाऊन गाडग्यात एका कापडात गुंडाळलेली ही शेंग आणून आजोबांकडे दिली. ती शेंग आजोबांनी तोडून मला ती साल चघळण्यास दिली १५ ते २० मिनीटामध्ये माझी उबळं थांबली.

जेव्हा माय व बाबा व मोठे मामा  आण्णा, बाबुराव मस्के  तुळशिराम मामा, नागूमामा जेव्हा बोरीला येतं त्यावेळी माझ्यासाठी ही शेंग आर्वजून आणत.   एवढी ताकत या आयुर्वेदामध्ये आहे.


0 Comments:

Post a Comment