लिंबू आणि त्यातील सत्त्वसार
https://www.swara33.com


बैठक काम करणारे,शरीराची हालचाल  करता एकाच ठिकाणी बसूराहणारे स्त्रि किंवा पुरूष, मुले किंवा मुली तसेच ज्येष्ठ सुद्धा ह्यांना या समस्येतून जावे लागत आहे. टिव्ही,मोबाईल वर तासं तास खिळवून बसणे यामुळे मुले आता ब्याडमिंटन, क्रिकेट, खोखो, कबडी व इतर खेळ मोबाईल वर खेळत  आहेत. शरिराची हालचाल न झाल्याने एकतर पोटाचा घेर आणि किंवा जाड होणे, शरीरावर चरबी वाढणे यामुळे ती सारखी त्रस्त असते. मग अवेळी जेवण करणे तर कधी डायटवर राहाणे, बाहेरील चटर बटर अशांना उठण्यास व बसण्यास अवघड जाते. वजन वाढल्यामुळे नंतर याचा परिणाम आपल्या गुडघ्यांवर पडतो आणि यामुळेच सांधेदुखीचा त्रास, टाच दुखीचा त्रास चालू होतो आणि मग  गुडघ्यातील हाडावर हाड घासल्यामुळे आत मधील कुर्चा कमी होतो. लिंबाचे दररोजच्या आहारात समावेश करावे यामुळे वाढलेलं वजन कमी करता येते. चला तर मग जाणून घेऊया लिंबू आणखी कोणत्या आजारावर घेता येते ते, आज आपण पाहू या..

लिंबू
लिंबामध्ये व्हिटामिन सी आहे आपल्या शरिराला आवश्यक असलेले घटक म्हणजेच फायबर यात आहेत. आपल्या रोजच्या आहारात आपण नेहमी लिंबाचवापर करतो, कधी लिंबपिळून रस घेतो तर आपत्याचे लोणचं करुन आहारात घेतो. लिंबू हे प्रतिकारशक्ती वर्धक आहे, पण ज्यांना पित्त होते त्यांनी ते थोड्या प्रमाणात घ्यावे किंवा घेऊच नये.

जाडपणा, वाढलेले वजन
पोटाचा वाढत जाणारा घेर हा पुढील आजाराचे लक्षण आहे.
शरिरावर चरबी वाढल्यामुळे र्हदय रोगाला निमंत्रण देते. शरिरातील नसांमध्ये ब्लाक होणे, सांधेदुखी, टाच दुखी अशी लक्षणे जाणवतात त्यासाठी ग्लासभर गरम पाणी कोमट झाल्या नंतर किंवा डिकाशन चहामध्ये त्यात लिंबाचे दोन किंवा तीन थेंब टाकावेत,  त्यामुळे चरबी बर्याच अंशी कमी होवून वाढलेले वजन कमी झाल्याचे जाणवते.
सूचना - कोमट पाण्यात किंवा डिकाशनमध्ये  एक लिंबू पिळून किंवा अर्धे लिंबू पिल्यास संडास लागू शकते.
त्यामुळे मात्रेप्रमाणे लिंबू प्यावे.

जलसंजिवनी
संडास उल्टी होवून येणारा अशक्तपणा, ग्यास्ट्रो झाला असेल तर लिंबू शरबत मध्ये थोडेसे मीठ टाकून जलसंजिवनी तयार करुन पिल्यास येणारा अशक्तपणा दूर होतो व बरे वाटायला लागते.

ग्यासेस किंवा करपट ढेकरे
अति जेवन केल्यानंतर अन्न पचन न झाल्यास या संमस्या जाणवतात त्यावेळी आपण सोडा, ज‌लजिरा यांचे सेवन करतो. दररोजच्या आहारात लिंबाचे लोणचे खाल्यास अन्नपचन चयापचय क्रिया व्यवस्थित होते.







0 Comments:

Post a Comment