आपले दात मोत्यांसारखे चमकदार बनवण्यासाठी करा हे घरगुती उपाय...

सगळ्यांनाच आपले दात मोत्यांसारखे चमकणारे असावेत, असे वाटते. कारण चमकणारे दात आपले व्यक्तिमत्त्व खुलवतात. आपले डाग पडलेल्या व पिवळ्या दातांमुळे आपण मनमोकळे पणाने हसू पण नाही शकत कुठे गेलो तरी अवघल्यासारखं वाटते. परंतु आपल्या काही वाईट सवयींमुळे आपले दात पिवळे पडतात . म्हणून आपण आपले दात पांढरे व चमकदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत . 


आपण आपले दात घासण्याकरिता सप्ताहातून २ ते ३ वेळा बेकिंग सोड्याचा वापर करायला पाहिजे. बेकिंग पावडर मुळे दात पांढरे होतात. पण बेकिंग सोड्याचा अतिवापर करू नये, वापर मर्यादित प्रमाणात करावा. कारण की बेकींग पावडर मुळे आपल्या दातांवरचे एनामल कमी होऊ शकते.

आपल्या दातांवरील पिवळे डाग दूर कर आपण तेलाचाही वापर करू शकतो. त्याकरिता तीळाचे किंवा खोबरेल तेल खाण्याचे हे सर्वोत्तम मानलं जाते. त्याच्यासाठी चमचाभर तेल तोंडात घेऊन आपल्या जीभेने संपूर्ण दातांवर पसरवावे. व त्या नंतर १५ मिनिटांनी चूळ भरावी. असे केल्यावर आपल्या दातांची स्वच्छता राखली जाते व पिवळेपणा दुर होतो.

आपण आपले दात स्ट्रॉबेरी व बेकिंग सोडा यांच्या मिश्रणाने सुध्दा घासु शकता. आपण आपल्या आहारात नियमित भाज्यांचा व फळांचा समावेश केल्यास तुमचे दात मजबुत व बळकट होतात. आपण जर का नियमित दात घासले व दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढून टाकले तरी आपले दात स्वच्छ राहतात.

मित्रांनो, जर तुम्हाला आमचा दातांवरील उपाय आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला फॉलो करा... तुम्हाला नवनवीन उपाय व माहिती देण्याचा प्रांजळ प्रयत्न करूत.
धन्यवाद..!





0 Comments:

Post a Comment