https://www.swara33.com


योगाने शरीरातील आत्मप्रबलता वाढते.

प्रत्येकाने शारीरिक व मानसिक व्यायाम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाची शरीरसंपदा आरोग्यसंपन्न व सुदृढ राहील प्रत्येकाचा सर्वांगिक त्या विकास महत्त्वाचा आहे. कारण यामधूनच त्याचे परिपूर्ण आरोग्य दिसून येईल शरीराच्या प्रत्येक भागांकडे लक्ष दिले पाहिजे आणि विविध प्रकारे त्या संदर्भात काम केले पाहिजे सर्वांनी मानसिक आरोग्यासाठी सकारात्मकपणे कार्य केले पाहिजे असे मला वाटते.योगाने शरीरातील आत्मप्रबलता वाढते.

त्यासाठी ध्यानधारणा करणे, वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करणे, आवश्यक आहे. ध्यान करणे सुद्धा महत्वाचे आहे, शरीरामध्ये प्राण असेपर्यंत. आपण जेथे जातो तेथे आपली प्रिय किंवा अप्रिय वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती आपल्या सोबत असतील किंवा नसतील,पण शरीर मन आणि नेहमी आपल्यासोबत असते.

शरीर मन व वाणीला स्वतःची स्वतंत्रतानाही,आपण हुकूम दिल्याशिवाय वाणी बोलू शकत नाही, व निर्णय घेऊ शकत नाही, व शरीर काहीच करू शकत नाही,आपला विवेक जागृत झाल्यावर आपण योग्य बोलतो योग्य निर्णय घेतो शरीराच्या मदतीने योग्य कर्म करतो.

परिणामी योगाने आत्मप्रबलता वाढते. आपल्याला शांती सुख समाधान मिळते, निस्वार्थपणे ज्ञानाशी विज्ञानाची मनन चिंतन या शब्दामुळे मनुष्य मनात आनंदी सुखी समाधानी जीवन जगू शकतो.

मन प्रसन्न ठेवणे काळाची व मनुष्याची गरज आहे विकास हा भौतीक नसून आपल्या आत्मिक गुणांचा विकास जास्त महत्वाचा आहे सांगायचे झाले तर शब्दांमध्ये प्रगती म्हणजे आपली आत्मिक प्रगती ज्या व्यक्तीकडे संतुष्टता सहिष्णुता योग शांती प्रेम आपुलकी प्रसन्नता यासारखे गुण नाहीत तो व्यक्ती माझ्या मते मागासलेलाच आहे, आणि जर त्याला प्रगती उन्नती करावयाची असेल तर हे सर्व गुण आत्मसात करायला हवेत. यामुळे योगाने शरीरातील आत्मप्रबलता वाढते.

0 Comments:

Post a Comment