‘सर्दी’ ही वेगवेगळ्या प्रकारची आसू शकते
ऋतु बदलामुळे काही जणांना नाकातून पानी येते तर काही जणांना अति थंड वातावरणामुळे म्हणजेच
थंडीच्या दिवसात शिंका येत आसतात तर काहींना पावसात किंवा थंड म्हणजे त्यात फ्रीज चे
पानी किंवा आईस्क्रीम व इतर थंड पदार्थ खाल्यामुळे सर्दी होत आसते. तर काहींना ही सर्दी
धुळी मुळे तर काहींना फुलामुळे म्हणजेच फुलांना नाकाजवळ धरल्यास सुद्धा सर्दी होत आसते.
तर काहींना अत्तर, उद्बती-धूप च्या वासामुळे तर
काहींना आनुवंशिकते मुळे सुद्धा सर्दी होते, इतरांना
सर्दी झाल्यास ती आपल्याला होते ही एक मानसिकता होऊन बसली आहे. सर्दी संसर्गजन्य आहे
हे बरोबर आसेल, आहे. तर काहीजनांना स्वंयपाक
घरात केल्या जाणार्या फोडणीमुळे सुद्धा सर्दी होऊ शकते, यामुळेच पुढे ही सर्दी वाढत जाऊन नंतर याचे रूपांतर दम्यामध्ये
सुद्धा होऊ शकते आणि नंतर ते सर्दी आणि खोकल्यामुळे घसा खवखवण्यास लागतो आणि त्या व्यक्तीस
श्वास घेतांना त्रास होण्यास सुरवात होते. नाक कोंडल्यामुळे काहीजनांना तोंडावाटे श्वास
घेताना सुई-सुई आसा ध्वनी त्या व्यक्तीच्या तोंडावटे निघतो हे सर्व एका सर्दी पासून होते यास आपण आलर्जी आसे
ही म्हणतो. त्यासाठी धूलिमद्धे काम करत आसतांना, स्वंयपाक
घरात केल्या जाणार्या फोडणीच्या वेळी नाकाला व तोंडाला रुमाल बांधावा जेणेकरून धुळीचे
कण, फोडणीचा वास आपल्या नाकात जाणार नाही. हे
सर्व करून आपणास आलर्जीचा जास्त त्रास होत आसल्यास त्वरित आलर्जी तज्ञ डॉक्टरांकडे
जाऊन विलाज करणे हिताचे ठरेल.
1 ‘सर्दी’ होऊ नये यासाठी फ्रीज चे आति थंड खाणे टाळा
-
फ्रीज चे अति थंड खाने कोणाहीसाठी योग्य नाही
अति थंड खाल्यामुळे दातास हानी पोहचते, यापासून पुढे दात हालायला किंवा दात दुखायला चालू होते हे लहान
मुलांना तसेच अति प्रमाणात थंड खानारांना
हे होऊ शकते. उन्हाळ्याचे दिवसात माठातील पाणी
आरोग्यासाठी चांगले आहे. पूर्वीच्या काळी आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये माठाचा उपयोग करणे हितावह समजले जायचे, त्याने सर्दी किंवा घसा खवखवत नाही. फ्रीज चा वापर भाज्यांसाठी
किंवा इतर पदार्थ जास्त दिवस ताजे राहण्या साठीच करावा.
‘'सर्दी’ झाल्यास घ्यावयाची काळजी -
आपल्यामुळे
इतरांना सर्दी होऊ नये त्यासाठी शिंकताना आपल्या नाकाला रुमाल लावावा हे आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी सांगितले
आहे, त्यासाठी मी आपणाला नव्याने परत सांगणे योग्य
नव्हे. पण आजची कोरोंनाची स्थिति पाहता काळजी घेण्यासाठी आपणास परत सांगतो आहे की, सुरवातीला आपणास शिंक
आली असता आपण आपल्या हाताच्या कोपर्याच्या
आतील भागास नाकाजवळ धरावे, किंवा रुमाल नाकाजळ लावावा जेणेकरून आपण शिंकलेले शिंकेचे शिंतोडे बाहेरील वातावरणात पसरणार नाहीत. शिंकलेल्या रुमालाला कोणत्याही कपडे
धुण्याच्या साबणाने लगेच धूऊन घ्यावे आपले
हात साबनाने स्वछ धूवावेत. आपल्या नाकाला चेहर्याला
किंवा डोळ्याला हात लाऊ नका किंवा इतर व्यक्ति पासून थोडे दूर उभे राहावे लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. त्यांना सर्दी लवकर होते आसे आज घडीला आजच्या वातावरनानुसार पाहावयास मिळते, दिसते. तसेच निरोगी व्यक्तीने
आजमितीस आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मी फार बळकट आहे, माझी
प्रतिकार शक्ति इतरांपेक्षा चांगली आहे, मला काही
होणार नाही ? म्हणून काळजी न घेता फिरलात तर, हा कोरोंना आपल्यामुळे दुसर्यास होऊ शकतो. कारण आपल्याला त्याचे लक्षणे दिसत नसल्यामुळे आपण इतरांच्या
संपर्कात येऊन आपण कोरोंनाचे वाहकाचे काम
तर करत नाहीत ना ? याची जान ठेवा.
0 Comments:
Post a Comment