तोंडाच्या दुर्गंधी वर घरगुती उपाय
जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुमच्यासोबत कोणीही बसायला अथवा कोणालाही तुमच्याशी बोलायला आवडणार नाही. जाणून घ्या तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचे उपाय अनेकदा ब्रश नीट न केल्यास अथवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर, तब्येत खराब असल्यास अथवा जास्त पॉवरची औषधे घेतल्यानंतर अनेकदा तोंडाला दुर्गंधी येते. तोंडाला दुर्गंधीची समस्या ही केवळ तुम्हालाच त्रासदायक ठरत नाही तर तुमच्यासोबतच्या लोकांनाही याचा त्रास होतो. ही गोष्ट तुमच्यासाठी शरमेची ठरू शकते. जरी तुम्ही कितीही भारी सूटबुटात वावरत असलात मात्र तुमच्या तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर कोणीही तुमच्यासोबत राहू शकणार नाही.
तोंडाला दुर्गंधी येत असल्यास करा हे उपाय
तोंडाला दुर्गंधी का येते ?
त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
जेव्हा पोट ठीक साफ नसते, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आतड्यांमध्ये खाणे खराब होऊ लागते, आणि याचा परिणाम तोंडावर होतो. श्वास सोडताना तोंडातून दुर्गंध येऊ लागतो. याशिवाय दात तसेच हिरड्यांचे आजार असल्यास तोंडातून दुर्गंध येतो.
यावर घरगुती उपचार
डाळिंबाची साल
जर तुम्हाला ही समस्या सतावत असेल तर डाळिंबाची साल यावर फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाची साल पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करा. श्वासातून येणारी दुर्गंधी हळू हळू कमी होईल.
भरपूर पाणी प्या
पाणी योग्य प्रमाणात न प्यायल्यास खाणे नीट पचत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. या कारणामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरूवात होते. यावरील इलाज म्हणजे भरपूर पाणी प्या. दिवसात कमीत कमी दीड ते दोन लीटर पाणी प्या.
सुके धणे
बडिशेपप्रमाणे सुके धणे एक चांगले माऊथ फ्रेशनर आहे. तोंडात धरून चावल्यास दुर्गंधी बरी होण्यास मदत होते.
बडिशेप आणि लवंग
बडिशेप आणि लवंग एक चांगला माऊथ फ्रेशनर आहे. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलात तर माऊथ फ्रेशनर म्हणून बडिशेप दिली जाते. जर तुम्हाला घरीही जेवणानंतर बडिशेप खाण्याची सवय लावली तर हळू हळू ही समस्या दूर होईल.
तुळशीची पाने
तुळशीची पाने ही चांगली आयुर्वेदिक वनस्पती आहे. याची पाने चावून खाल्ल्याने तोंडातून येणारा दुर्गंध कमी होतो. तोंड आल्यासही तुम्ही याचा वापर करू शकता. या दररोजच्या सेवनाने साऱ्या समस्या दूर होतात.
तिळाचे तेल आणि मीठाने मसाज
तिळाचे तेल आणि त्यात मीठ टाकून या पेस्टने दातांची सफाई करा. यामुळे दातांमध्ये होणाऱ्या पायरिया आजारापासून मुक्ती मिळते. तसेच तोंडातून दुर्गंध येणेही दूर होते.
क्रमशः
0 Comments:
Post a Comment