Home »
»
ओवा
अजीर्ण झाले असल्यास ओवा खावा अजीर्ण होतं नाही. जास्त जेवण झाले असेल, अंबट ढेकर येत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ओवा चावून खावा जेवण झाल्यावर छातीत जळजळ होत असल्यास पाव चमचा ओवा एका बदामा सोबत खावा जळजळ कमी होते. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा तो थंड झाल्यावर सेवन करावे.
भूक लागत नसेल तर रोज सकाळी ओवा चावून खावा दोन-चार दिवसात भूक लागू लागते. वारंवार लघवी होत असल्यास अर्धा चमचा ओवा इतकाच गूळ घेऊन त्याच्या चार लहान गोळ्या कराव्यात एकेक गोळी चार तासांनी खाऊन चारही गोळ्या संपूर्ण दिवसात खाव्यात लघवीचे प्रमाण कमी होते. ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते.
आवळा
आवळा आवळ्याचा रस पित्तनाशक आहे त्यामुळे चक्कर येत असेल डोळ्यांपुढे अंधेरी येत असेल तर आवळ्याचा रस दोन तोळे दोन तोळे खडीसाखर घालून घ्यावा दोन दिवस घेतल्यास पित्त कमी होते. लघवी साफ होत नसेल किंवा लघवी करताना आग जळजळ असेल किंवा थोडी थोडी होत असेल तर आवळ्याचा रस दोन तोळे दोन तोळे खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा घ्यावी. आवळ्यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील मुरूम, फोड घालवण्यास मदत करते. रोज आवळा खाल्यानं त्वजा तजेल राहाते. गर्भवती महिलांनी आवळा खाल्ल्यास बाळाचे वआईचे उत्तम पोषण होते. आवळा खाल्ल्यानं पोट साफ राहातं, पित्ताचा त्रास होतं नाही. अशक्तपणा दूर होतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी नियमित आवळा खावा.
हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे यांसारख्या आजारांवर आवळा उत्तम औषध आहे.
आवळ्यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते. मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी. रोज एका आवळ्याचं सेवन करायला हवं.तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा तुम्ही खाऊ शकता. रोज सकाळी आवळा सरबत घेतलं तरीही आराम मिळतो. हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी घेऊ शकता. याशिवाय आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली जाते. लहान मुलांना मुरांबा किंवा मोरावळा स्वरूपात पोळीसोबत खाण्यासाठी आवळा दिल्यास मुलंही आवळा खातात. रोज आवळ्याची एक फोड खायला हवी. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.
0 Comments:
Post a Comment