तेलकट त्वचा :
एक मोठा चमचा मुलतानी माती एक लहान चमचा विच हजेल आणि एक मोठा चमचा गुलाब पाणी एकत्र करा हा फेस पॅक तेलकट त्वचेसाठी उपयुक्त ठरतो
कोरडी त्वचा :
दोन मोठे चमचे जवाचे पीठ सात-आठ थेंब ऑलिव ऑइल आणि एक मोठा चमचा ग्लिसरीन एकत्र केल्यास हा फेस पॅक तयार होतो
सर्वसाधारण त्वचेसाठी :
अंड्याच्या पिवळ्या बलकात अर्धा चमचा लिंबू रस आणि दोन चमचे संत्र्याच्या सालीचा चुरा मिसळून हा फेस पॅक तयार होतो.
कांतिहीन आणि निर्जीव त्वचेसाठी :
दोन मोठे चमचे जवाचे पीठ सात-आठ थेंब ऑलिव ऑइल आणि एक छोटा चमचा ग्लिसरीन हा फेस पॅक कांतीहीन आणि निर्जीव त्वचेसाठी वापरावा.
डागाळलेल्या त्वचेसाठी :
एक लहान चमचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्र करून चेहऱ्याला लावा.
सुरकुत्या असलेली त्वचा :
अंड्याच्या सफेद बलकात एक चमचा मध मिसळून तो चेहऱ्याला लावा आणि अंधाऱ्या खोलीत विश्रांती घ्यावी अर्धा तासाने चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा यामुळे सुरकुत्या थोड्याशा प्रमाणात कमी होतात
घरगुती ब्युटी टिप्स उपाय हे आपल्याला माहीतगार योग्य वाटत असल्यास आम्हाला फालो, लाईक,शेअर करा व आपल्या काही सूचना, कमेंट असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही आपल्या सूचनांचे तंतोतंत निराकरण करूत.
स्वरा ब्युटी हेल्थ / उन्नती ALL OF तर्फे आपणांस धन्यवाद..!
ghobalemilind@gmail.com
ghobaleb1980@gmail.com
0 Comments:
Post a Comment