Home »
»
थोडक्यात पण महत्वाचे
पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवण करून बाटलीचे तोंड सीलबंद करावे या पाण्याने दररोज चेहरा धुतल्यास चेहरा नितळ होतो.
शरीरावरील कांजण्याचे डाग घालविण्यासाठी कडुनिंबाची पाणी उकळलेले पाणी थंड करून वापरल्यास फरक पडतो.
पपई खाल्ल्यानंतर साल फेकून न देता चेहर्यावर चोळावे याने चेहरा स्वच्छ होतो.
अब्रो पेन्सिल रात्री फ्रीजमध्ये ठेवून सकाळी टोक करावे टोक चांगले होते व वापरण्यास सोयीचे होते.
केस गळत असल्यास नारळाच्या दुधात लिंबाचा रस घालून केसांच्या मुळांना सोडावे एक तासानंतर केस धुवावे हा प्रयोग आठवड्यातून एकदा करावा.
केसात कोंडा होत आहे असे वाटल्यास मेथीचे चमचाभर पाणी घालून ते दह्यात मिक्स करून केसांना चोळावे व नंतर केस धुवावेत त्यामुळे केसात कोंडा होत नाही.
रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घेतल्यास चेहऱ्यावरील पुटकुळ्या जाऊन चेहरा नितळ होण्यास मदत होते.
पुदिन्याचा रस काढून फ्रिजमध्ये ठेवावा रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लावून सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यास पिंपल्स तर जातातच पण त्याने जुनी डागही जातात.
चवळीच्या शेंगा चा रस काढून त्यात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा खूप उजळतो व कांतिमान दिसतो.
स्वरा, उन्नती ब्युटी हेल्थ, संचिता रेशिपी या पेजला आपण लाईक फालो केलात त्याबद्दल आपले मनस्वी आभार या पुढेही आम्ही आपणांस नवनवीन माहिती देण्याचा प्रांजळ प्रयत्न करूत.
स्वस्थ रहा निरोगी रहा, आरोग्याची काळजी घ्यावी.
स्वरा ब्युटी पार्लर.
0 Comments:
Post a Comment